
जाणून सुद्धा अगम्य सारे..
जगणे इतुके अशक्य का रे ?..
उलगडणारे साधे कोडे..
अवघड होते आणिक थोडे..
कधी सुटावे सहजासहजी..
अतर्क्य क्लुप्त्या.. गूढ इशारे..
जगणे इतुके अशक्य का रे ?..
वाळूवरती चार अक्षरे..
जरी रेखीली नव्या दमाने..
पूसून जाती लाटा काहीच..
घडले नव्हते अशाप्रमाणे..
लिहून देखील सबंध कोरे..
जगणे इतुके अशक्य का रे ?..
कुणी स्वतःहून साद घालते..
कुणी पाहूनी वाट बदलते..
अवतीभवती वावरणारे..
तेच खरे का.. सगेसोयरे..?
जगणे इतुके अशक्य का रे ?..
असाध्य नसते कधीच काही..
जगणे सुद्धा अशक्य नाही..
कधी तपस्या...किंचित संयम..
अन जिद्दीच्या नित्य आधारे..
जगणे व्हावे सुसह्य सारे..!!!
4 comments:
jagane jaaude.. tujhyaasaarkhe itke "apratim" sahajgatyaa lihine amhaalaa ashaky aahe.. chhaan sopyaa shadhaat.. mast hai..!
पूजा, कविता आवडली.
(डोस : पण शुद्धलेखनाकडे लक्ष द्यायला हवं आहे बरं का. कवितेत उच्चारांनुसार आणि गद्यात व्याकरणाच्या नियमांनुसार. उदा: ’अनुषंगाने’ असा शब्द आहे.) :)
sry guru.......wl definitely tek care of dat :-)
तुमच्या कविता मी आवर्जून वाचतो. साहित्यिक मूल्य म्हणून त्या उत्कृष्ट्च आहेत पण त्या वाच्ण्यापुर्त्याच ठीक आहेत...त्या अनुभवण महाभयंकर... एवढ्या त्या दाहक आहेत. तुमच्या आयुष्यात आलेले भलेबुरे प्रसंगच तुमच्या कवितेला-कलाकृतीला जन्म देतात. संघर्शाशिवाय जीवन असूच शकत नाही...याची जाणीव झाली की कदाचित तुमच्या कविता सुसह्य होतील.
नकारात्मक दृष्टीकोनातून आपण आपल्या दु:खाचं भांडवल करतो- प्रदर्शन करतो. असे नकारात्मक विचार मान्ड्णे व्यक्तिस्वातंत्र्य- म्हणून ठीक आहे... पण जगणं एकदाच...कुणी पाहिलाय दुसरा जन्म ?
जगण्याकडे सकारात्मक भावनेनं पाहिलं की जीवन किती सुन्दर आहे आणि आपण भाग्यवंत याची जाणीव तुमच्या कविता वाचूनच मला झाली म्हणून ही प्रामाणिक प्रतिक्रिया!!!
ध्येयासक्त आशावाद जेव्हा इतका दृढ होईल..
तुझ्या नकळत तुझं ध्येयं तुझ्यासमोर उभं राहिल.. व्वा!!!
सुखदु:खाची बेरीज वजाबाकी, प्रेमयोग-वियोग, व्यवहारातील फायदा तोटा, वासना कामना, कर्तृत्वाचं मोजमाप, बौद्धिक गुंता, खऱ्या खोट्याची स्पर्धा या सर्वान्पलिकड़े जावून एक माणूस म्हणून आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्नच कदाचित तुमची कविता करते आहे... तिला उध्वस्त, क्षणभंगुर, दुरावा, निरोप,आंधी, मौत, अशक्य अधुरासापन, हरन्याचा सराव, रिक्त पोक्ळ्या, सक्त बंधने, काळोखात कोंडलेली, दुबळे अश्रू , रितेपण, घुसमटलेला गंध... ओसाड भग्न्न आणि भकास रुक्ष वाळवंटात, पोळले हात, खुळा प्रयास, पानझड, उदास वळणे, निर्जीव पाषाण, विवंचनांचे विशाल अंगण, व्यवहारी अन विरक्त, कोरडा आकांत इ. शब्दांत... भावनांत जास्त दिवस घुटमळू देवू नका... तुमची कविता उज्ज्वल आहे...तुमचं भविष्य उज्ज्वल आहे !!!
तुम्हाला सहज सुन्दरतेचा, साधेपणाचा, सात्विकतेचा, मान्गल्याचा, परिपूर्णतेचा ध्यास आहे. पण त्याचवेळी आपण माणूस आहोत आणि आपल्या अवतीभोवतीचीही शेणामातीचीच माणसं आहेत याचं भान राहिलं तर अपेक्षाभंगामुळे येणारं नैराष्य हलकं होईल.
तुमचे शब्द वाचकाला कापतात...तुमच्या शब्दांचे घाव जखमा करतात...
आता त्या शब्दांचा उत्सव होतो का ते पहा...सोह्ळा घडतो का ते पहा...
आनंदाच्या कविता लिहा...तुमच्यासारख्या शब्दसन्पन्न कवियत्रीला असंख्य विषय साद देतील. विरक्तिचं तुमचं वय नाहीए. तारुण्याचा आस्वाद घ्या. जीवन फार सुन्दर आहे आणि जन्म एकदाच !!!
आत्मकेन्द्री कविता लिहून प्रतिभेला मर्यादा घालू नका...
हळूवारपणे, अलगदपणे नाजुकपणे जीवनाची रहस्य तुमच्या कवितेतून उलगडत जातील तेव्हा आम्हा वाचकांना ब्रह्मानंद मिळेल.
जीवन क्लिष्ट करते ती विकृती... कला जीवनाचा गुंता सोडवते...मोकळ्न करते... मुक्त करते.
तुमच्या ओंजळीत तेजाची कवने होवो...
नव्या प्रभाती नवे काव्य रचण्याची उमेद येवो !!!
तुमच्या या वळणचा महामार्ग बनवा... बाकी दुनिया गेली उडत!!!
Post a Comment