Sunday, January 11, 2009

गणित !!!


तसा माझा गणिताशी .. पूर्वीपासूनच ३६ चा आकडा..
म्हणूनच की काय..आयुष्याचं गणितसुद्धा सुटता सुटलं नाही..
उणे अधिक करत जुळलेल्या नात्यांत..आपलं म्हणावं असं कुणी भेटलं नाही..
पुन्हा म्हणून पाहीला.. आयुष्याचा पाढा..पुन्हा मोजून काढल्या गतकाळाच्या चुका..
पण त्या एकसूरी गणिताच्या गाण्याला..नव्हता शाश्वत तालाचा ठेका..!
सगळीच समीकरणं क्षणिक होती..पण विचार करायला लावणारी..
आकडेमोडही बरीच होती..दहा बोटांत न मावणारी..!
पण मी मोजत गेले सरसकट..कधी बरोबर.. तर कधी चुकत चुकत..
एखाद दुसरे हातचे सोडले तर..सगळीच बाकी शून्य होती..
आणि बाकी धरून गणती केली..तरी सारी हयात नगण्य होती..
असं आयुष्याचं क्लीष्ट गणित.. काही केल्या सुटलं नाही..
संदेहाचा कलह सुरूच्..वादळ काही मिटलं नाही..
हातावरच्या भाग्यरेषा.. फक्त सोबत पुसत गेल्या..
अन वर्ष वजा होता होता.. काही ओळी सुचत गेल्या..
घडली कविता.. भिडले शब्द.. जुळून आला ताळमेळ..
आयुष्याचं गणितच अजब.. पण सरावाचा झालाय खेळ..!!!

3 comments:

Yogi... Yo Rocks.. !! said...

तडाखेबंद शब्दांची गुंफण आहे.. मस्त !

आयुष्याचे गणित सोडविण्याची जबाबदारी त्याची ज्याने हे आयुष्य दिलेय..!! ते अजबच असणारेय.. आपण फक्त सराव करावा..बाकीचे घेईल देव बघुन.. :)

Unknown said...

very nice poem

Zero_Logic said...

Good one ....Keep writing